

मी दिवसभरात बराचसा वेळ हे स्वतःला apply करते , अगदीच नाही जमले तर आठवड्यातला एक दिवस असा असतो ज्याला मी म्हणते "No Instruction Day " . म्हणजे माझ्या मुलीला मी त्यादिवशी काही Instructions देत नाही ,अगदीच नाही शक्य झालं तर minimum to minimum Instructions असतात. म्हणजे अगदी मोजून दिवसभरात ४ ते ५ instructions ते हि खूपच आवश्यक असेल तरच.
जेव्हा पासून मी हि प्रॅक्टिस सुरु केली , महत्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे , ह्या Instructions देण्याची सवय मलाच जास्त लागली होती . आणि त्यामुळे instruction येई पर्यंत काही न करण्याची सवय तिला !
जस कि , दात घास ग .... पटापट अंघोळ कर ग .... चल , आता लगेच हे खाऊन घे .... बघ किती वाजलेत ... अभ्यास झाला का ...? काय सगळं आरामात करतेय , माझी मीटिंग आहे मला आवरायला मदत कर ... असे अनेक Instructions ... .
पण जेव्हा हा No instruction डे असतो ना , तेव्हा मलाच बरं वाटत कारण मी स्वतःचा एक pattern break करतेय .कारण नसताना instruction देत राहण्याचा. मज्जा म्हणजे , मला सवयी प्रमाणे मनात instruction आली आणि मी जाणीवपूर्वक ती थांबवली तर आपोआप मी माझ्या मुलीला Observe करण्याच्या mode मध्ये जाते म्हणजे instruction mode off आणि Observation mode on . ह्याने झालं काय , जिथे instruction द्यायची वेळ होती तिथे interaction ला scope मिळाला आणि मग creative प्रश्न उत्तर आणि गप्पा...!
आठवड्यातून हा असा एक Instruction ब्रेक प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांच्या जास्त जवळ नेईल असं मला वाटतं ...!