
30 Jul 2025

परीक्षेची तारीख जवळ आलीय म्हणून आज सकाळ पासून अभ्यास सुरु केला , घरातली काम , ऑफीस ची काम त्यात वेळ काढून काही धडे पूर्ण केले . मुलीची परीक्षा नाही ,बरं का ... माझी परीक्षा , "Child Psychology Counselor " ची ...! मला असा, शाळेचा अभ्यास करावं तसा अभ्यास करताना बघून तिला प्रश्न पडला .... आई तू हे काय करतेयस ?अभ्यास...! मी म्हटलं .तू अभ्यास ???? पण तू का ??? तू तर शिकवते ना , मग ?म्हणूनंच , मी अजून अभ्यास करतेय आणि ऐक, माझी परीक्षा आहे, मला हे पुस्तक पूर्ण वाचायचं आहे, तर आज तुझी काम तू आटप आणि तू ठरव आज काय करायचं ते . हं .....! म्हणत ती गेली .बराच वेळ जराही आवाज आला नाही . तासाभराने माझ्या लक्षात आलं, काही गडबड जाणवत नाहीये, म्हणून काय चालू आहे हे पाहण्यासाठी गेले तर , मला दिसलं ... गोष्टीच्या पुस्तकांनी रांग लावली होती ,स्वतःला वाचून घेण्यासाठी .... आणि ते पाहून पुन्हा एकदा मला जाणवलं ...Action Speaks Louder than Instructions